Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Pune Speeding Car Crash : पुण्यात भरधाव कारने सहा दुचाकी आणि रिक्षाला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ४ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Pune Accident child death news

Pune Accident child death news

esakal

Updated on

Pune Khadakvasla Accident : पुण्यातील खडकवासला परिसरात भरधाव कारने भीषण अपघात घडवून आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भरधाव वेगातील कारने तब्बल सहा दुचाकी आणि एका रिक्षाला जोरदार धडक दिल्यानंतर ती थेट एका दुकानात घुसली. या भीषण अपघातात ४ वर्षीय चिमुकल्या यशराज निलेश कांबळे याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३ ते ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com