esakal | Pune सर्व क्रीडा स्पर्धांनाही परवानगी द्यावी : स्पोर्टस् असोसिएशन
sakal

बोलून बातमी शोधा

क्रीडा

सर्व क्रीडा स्पर्धांनाही परवानगी द्यावी : स्पोर्टस् असोसिएशन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट : कोरोना महामारीनंतर आता शाळा, मंदिरे आणि नाट्यगृहे सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे क्रीडा प्रकारांच्या विविध स्तरीय स्पर्धांना परवानगी लवकर द्यावी, अशी मागणी बॉऊंडलेस स्पोर्टस् असोसिएशनच्या वतीने लतेंद्र भिंगारे यांनी केली आहे.

भिंगारे म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीला निरोगी व सुदृढ करण्याचे व रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्याचे सामर्थ्य क्रीडा क्षेत्रात आहे. त्यामुळे जिम, कराटे, योगा प्रशिक्षण वर्ग व विविध क्रिडाप्रकारांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. क्रीडाडापट्टू उदासीन व अस्वस्थ झाला आहे. मात्र, लॉकडाऊनमध्ये शिथिलता असल्याने क्रीडा प्रकारांचा सराव होत आहे. क्रीडापटूंना त्यांच्या प्रमाणपत्रांचा अनेक ठिकाणी उपयोग होतो. त्यामुळे शासनाने तात्काळ तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांनाही परवानगी द्यावी, असे त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे.

loading image
go to top