Pune SRA Scam: टीडीआर १०९ कोटींचाच; जनता वसाहत झोपडपट्टीबाबतच्या पत्राने गैरव्यवहार उघड
Pune News: पुण्यातील जनता वसाहतीच्या टीडीआर घोटाळ्याचा पर्दाफाश नोंदणी विभागाने केला आहे. चुकीच्या सर्व्हे नंबरमुळे ७५० कोटींचा टीडीआर व्यवहार आता १०९ कोटींवर आला आहे. या प्रकरणाने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
पुणे : पर्वती पायथ्यालागत असलेल्या जनता वसाहत झोपडपट्टीखालील जागा ताब्यात घेऊन टीडीआर देण्याच्या प्रस्तावात आर्थिक घोळ कशा प्रकारे घालण्यात आला होता, हे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागानेच आता उघड केला आहे.