
पुणे : शुक्रवार, शनिवार आणि रविवार (१५ ते १७) अशी सलग तीन दिवस सुट्टी मिळाल्याने एसटी प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने अतिरिक्त बस सोडण्याचे नियोजन केले आहे. स्वारगेट बस स्थानकातून कोल्हापूर व सोलापूर आणि वाकडेवाडी येथून नाशिक व छत्रपती संभाजीनगरसाठी अतिरिक्त बस सोडण्यात येणार आहे.