
Pune ST Bus Runs Without Door on Otur Narayangaon Route Passengers Travel in Danger
Esakal
पिंपळवंडी,ता.१६: प्रवाशांच्या सेवेसाठी असं ब्रीद घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवासी सेवा पुरवणाऱ्या MSRTCच्या अनेक बसगाड्या नादुरुस्त आहेत. प्रवाशांकडून सातत्यानं याबाबत तक्रारही दिली जाते. मात्र नादुरुस्त बसमधून प्रवाशांना नेत त्यांचा जीव धोक्यात घातला जात असल्याच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत. ग्रामीण भागासाठी एसटी बस सेवा ही जीवनवाहिनी आहे, पण हीच जीवनवाहिनी जीवावर बेतण्याची भीती व्यक्त केली जातेय. पुण्यात ओतूर-नारायणगाव मार्गावर धावणाऱ्या बसला चक्क दरवाजाच नसल्याचं आढळून आलंय. चालकाच्या बाजूला दरवाजा नसतानाही बसमधून प्रवाशांची वाहतूक करण्यात येतेय. याचा फोटो आता समोर आला आहे.