पुणे स्थानक प्लॅटफॉर्मचे तिकीट पुन्हा १० रुपये

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

पुणे - पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट २० रुपयांवरून पुन्हा १० रुपये करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. 

रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत १५ फेब्रुवारी रोजी वाढविण्यात आली होती. सुट्यांचा हंगाम असल्यामुळे स्थानकावर प्रवाशांची गर्दी होते. त्या वेळी प्रवाशांसमवेत त्यांना सोडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढविण्यात आले, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला होता. 

रेल्वे स्थानकावर पुलाच्या दुरुस्तीचेही काम सुरू आहे. त्यामुळे अनावश्‍यक गर्दी होऊ नये, असाही दृष्टिकोन त्या मागे होता. प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढविण्याचा अधिकार मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापकांना आहे. त्यानुसार दरात बदल झाला होता. परंतु व्यवस्थापकांनी मनमानी करून तिकीट दरात वाढ केली, अशी तक्रार रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा यांनी मध्य रेल्वेच्या मुंबई कार्यालयात केली होती. या पार्श्‍वभूमीवर प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर कमी झाले आहेत. देशात सुमारे ८५०० रेल्वे स्थानके आहेत. त्यावरील प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर रेल्वे बोर्डाकडून ठरविण्यात येतात. 

प्रवाशांची रोजची ये-जा - १,००,०००
रोजच्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या - २७५
लोकलच्या फेऱ्या - ४४ 

Web Title: Pune Station platform ticket and Rs 10