कोरोनाची साखळी तोडण्यात पुण्यात अद्याप अपयशच!

Pune still fails to break the chain of corona virus
Pune still fails to break the chain of corona virus

पुणे : रुग्णांची संख्या कमी होत आहे असे वाटत असतानाच पुण्यात गेल्या दहा दिवसांत नव्या 12 हजार 993 रुग्णांची भर पडली आहे. गेल्या आठवड्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण नव्या रुग्णांपेक्षा जास्त होते, मात्र ते प्रमाणही कमी झाल्याने पुण्याची चिंता वाढली आहे. गेल्या दहा दिवसांच्या आकडेवारीवरून पुण्यात कोरोनाची साखळी तोडण्यात अद्याप यश आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गणेशोत्सवाच्या तयारीपासून शहरात घराबाहेर पडणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. त्याचा परिणाम आता नव्याने वाढणाऱ्या रुग्णांच्या आकडेवारीत दिसू लागले आहेत. 20 ऑगस्टपासून सरासरी दररोज पंधराशे नव्या रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे पुण्यातील रुग्णांची एकूण संख्या 85 हजारांच्या घरात गेली आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे उपचार घेणाऱ्या (ऍक्‍टिव्ह) रुग्णांची संख्या आटोक्‍यात राहिली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत नव्या रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या काही प्रमाणावर जास्त होती. पण गेल्या दहा दिवसांचे आकडे पाहिले तर नव्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. 15 ते 24 ऑगस्ट या दहा दिवसांत 12 हजार 993 नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर 12 हजार 677 रुग्ण बरे झाले. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 14 हजार 686 पर्यंत वाढली आहे.

जम्बो हॉस्पिटल बुधवारपासून कार्यान्वित होत असले तरी अजूनही पुण्यात बेड मिळविण्यासाठीची धावाधाव सुरू आहे. खासगी रुग्णालयांकडून घेण्यात येणाऱ्या बिलाबाबत मोठ्याप्रमाणावर तक्रारी आहेत. त्यामुळे सरकारी रुग्णालयांत बेडची मोठी मागणी असून, अद्याप मागेल त्याला बेड मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. गेल्या दोन दिवसात पुण्यातील कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आतापर्यंत 2 हजार 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 487 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. गणेशोत्सवात हे प्रमाण वाढणार नाही, यासाठी काळजी घेतली जात असल्याचे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले.

पुण्यात फिल्मीस्टाईल थरार; खूनाचा प्रयत्न करणाऱ्याचा पोलिसांनी केला पाठलाग आणि...

नवे रुग्ण (15 ते 24 ऑगस्ट)
15 : 1023
16 : 1522
17 : 835
18 : 1224
19 : 1211
20 : 1669
21 : 1556
22 : 1577
23 : 1225
24 : 1101
एकूण : 12993


बरे झालेले रुग्ण (15 ते 24 ऑगस्ट )
15 : 1145
16 : 1412
17 : 1049
18 :1168
19 : 1089
20 : 1386
21 : 1570
22 : 1427
23 : 1243
24 : 1188
एकूण : 12677


दर्जा! पुण्याच्या तरुणानं 22 हजार नाण्यांपासून बनवलं 200 किलोचं शिवलिंग

पुण्यातील कोरोनाची सद्यःस्थिती
एकूण चाचण्या : 407924
एकूण रुग्ण : 84496
एकूण बरे झालेले : 67777
उपचार घेत असलेले : 14686
एकूण मृत्यू : 2033

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com