
Pune News : पुण्यातील लष्कर परिसरातील एका कॉलेजबाहेर किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडलीय. दहा ते पंधरा विद्यार्थ्यांच्या टोळक्याने एका विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याला एका वृद्धानं वाचवल्यानं मोठा अनर्थ टळला. पण या घटनेमुळं कॉलेजसह परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.