Pune Students Protest: दिल्लीतील लाठीमार विरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा एल्गार; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी

दिल्लीतील जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा निषेध करत पुण्यात भिडे वाडा ते स्टेशनपर्यंत मोर्चा; पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी
The march demanded action on examination irregularities and called for accountability over issues affecting students.

The march demanded action on examination irregularities and called for accountability over issues affecting students.

Sakal

Updated on

प्रज्वल रामटेके

पुणे : ‘पेपर लीक की ये सरकार, नहीं चलेगी अबकी बार’ अशी गर्जना करत दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीसह विविध राजकीय पक्ष, सामाजिक, विद्यार्थी आणि कामगार संघटनांतर्फे गुरुवारी (ता. २३) भिडे वाडा ते पुणे स्टेशनपर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेला खेळ थांबवून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com