

Registrar Taru Under Departmental Probe
Sakal
पुणे : मुंढव्यातील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांची नियम डावलून काम करणे, शासनाचा महसूल बुडविणे आदी प्रकरणांत यापूर्वीच खातेनिहाय चौकशी सुरू असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बावधन येथील हवेली नंबर ४ येथील त्यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व दस्तांची नोंदणी तपासणी करण्याचे आदेश सहनोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांनी सहजिल्हा निबंधकांना दिले आहेत.