केंद्र सरकारने ऐन दिवाळीत सामान्यांचं दिवाळं काढलं : सुप्रिया सुळे

कोरोना महामारीत देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला.
सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळेsakal

आंबेगाव बुद्रुक : कोरोना महामारीत देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. शिवाय कोविड महामारी मध्ये अनेकांच्या नोकऱ्या अचानकपणे गेल्या. मोठं मोठे उद्योगही यामध्ये डबघाईला आले. यामध्ये बरेच तरुण बेरोजगार झाले. या पार्श्वभूमीवर,शारदा फौंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंबेगाव येथील जांभूळवाडी तलाव लिपाणे वस्ती परिसरात नोकरी महोत्सवाचे आयोजन शारदा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश वनशिव व प्रिया वनशिव यांचे वतीने करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उदघाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना सुळे म्हणाल्या, केंद्र सरकारने सामान्यांचे ऐन दिवाळीत दिवाळं काढले आहे. हे सरकार देशात आणखी राहिले तर आपल्या मुलांना चकल्या,लाडू अशा फराळाच्या गोष्टी मोबाईल मध्ये दाखवाव्या लागतील. महागाईने प्रत्येक गोष्टीत उच्चांक गाठला आहे. संसदेत तरुणांच्या बेरोजगारीचा व महागाईचा प्रश्न मांडणार आहे.

सुप्रिया सुळे
अजित पवारांमुळेच पुण्यातील कोरोना कमी होऊ शकला : सुप्रिया सुळे

आपल्या पुणे महापालिकेत ट्रॅफिक सिग्नलचा देखभाल खर्च ५८ कोटी होतो आहे.याचा विचार करून नागरिकांनी येत्या पालिका निवडणुकीत आपला लोकप्रतिनिधी निवडायचा आहे. पत्रकारांच्या सर्व्हेनुसार पुण्याचा महापौर हा राष्ट्रवादीचा होणार आहे. असेही सुळे बोलताना म्हणाल्या.

नोकरी महोत्सवाचे आयोजक गणेश वनशिव बोलताना म्हणाले की, शारदा फौंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहयोगाने बेरोजगार तरुणांचा प्रश्न सोडवावा वाटला. शिवाय माझ्या आंबेगाव बुद्रुक, खुर्द, जांभूळवाडी, कोळेवाडी, शनीनगर परिसरातील तरुणांच्या दारी रोजगारी न्यावा अशी संकल्पना मनात आली.त्यामुळे या महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना लागलीच जॉइनिंग लेटर देण्यात येणार आहे.या महोत्सवातुन साधारण पाच हजार तरुणांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा आहे.

कार्यक्रमाला,महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,काकासाहेब चव्हाण नगरसेवक युवराज बेलदरे, नरसेविका स्मिता कोंढरे,त्र्यंबक मोकाशे,शाम शिंदे,सुधीर कोंढरे, आयोजक प्रिया वनशिव आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com