

Pune Dowry Death Case: Husband Arrested After Woman Dies Under Suspicious Circumstances
esakal
Pune Dowry Death Case: पुण्यातील मुकुंदनगर परिसरात ३४ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पायल झांबरे-पाटील हिचा सोमवारी एका फ्लॅटमध्ये मृतदेह आढळला. सासरच्या मंडळींकडून सोन्याच्या मागणीसाठी मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप त्यांच्या माहेरच्या नातेवाइकांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती अक्षय झांबरे-पाटील याला अटक केली आहे.