Ganeshotsav Travel Rush at Pune Swargate Bus Stand : गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यानिमित्त गावी जाण्यासाठी प्रवाशांची लगबग सुरु झाली आहे. मात्र, त्यांच्या प्रवासातील विघ्न काही कमी होताना दिसत नाही. गाड्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे पुण्यातील स्वारगेट बस स्थानकांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी बघायला मिळते आहे. अनेक प्रवाशी गाड्यांची वाट बघत तातकळत उभे आहेत.