Pune Voter Awareness : आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जागृती मोहीम!

SWEEP Program : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएल सेवकांमध्ये स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जागृती मोहीम राबवण्यात आली. यामध्ये सर्व सेवकांनी मतदान करण्याची शपथ घेतली.
SWEEP Program for Voter Awareness in Pune

SWEEP Program for Voter Awareness in Pune

Sakal

Updated on

हडपसर : पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील निवडणूक कार्यालयाच्यावतीने पद्धतशीर मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग (स्वीप) कार्यक्रमांतर्गत प्रभागातील पीएमपील सेवकांमध्ये "मतदान जागृती मोहीम' राबवण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रवी खंदारे व सुनील पाटील यांनी हडपसर गाडीतळ पीएमपील आगार मधील सर्व सेवकांनी मतदान करण्याची शपथ यावेळी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com