esakal | Pune: तळेगाव ढमढेरे : आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम अपूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम अपूर्ण

तळेगाव ढमढेरे : आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम अपूर्ण

sakal_logo
By
नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील नूतन इमारतीच्या राहिलेल्या अपूर्ण कामाची त्वरित पूर्तता करून, जुन्या इमारतीतील दवाखान्याचे सर्व कामकाज नूतन इमारतीत स्थलांतरित करावे अशी मागणी सरपंच अंकिता भुजबळ व उपसरपंच नवनाथ ढमढेरे यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाची प्रत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतीने दिली आहे.

दरम्यान, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची ग्रामपंचायतीच्या आरोग्य समितीच्या सदस्यांनी भेट घेऊन वरील मागणी केली आहे. यावेळी बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल भुजबळ, सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच नवनाथ ढमढेरे, सदस्य संतोष ढमढेरे, मच्छिंद्र भुजबळ व ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब लांडे व वसंत भुजबळ यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीची गुरुवारी पाहणी केली.

हेही वाचा: पुण्यात सलग ७५ तास कोरोना लसीकरण मोहिम

येथील नूतन इमारतीत पाणी, वीज व इतर सुविधांची कमतरता असून, अपूर्ण कामांची वरिष्ठांना कल्पना देऊन त्वरित अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करून, जुन्या इमारतीतील दवाखान्याचे कामकाज नूतन इमारतीत स्थलांतरित करावे अशी मागणी यावेळी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे आरोग्य समितीच्या सदस्यांनी केली आहे.

दरम्यान, तळेगाव ढमढेरे गाव लोकसंख्येने मोठे असून, येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत परिसरातील १६ गावांचा समावेश होतो. कोरोनाच्या काळात नागरिकांना चांगली सेवा मिळण्यासाठी नूतन इमारतीत कामकाज नेणे गरजेचे असल्याचे ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आले आहे. तशेच रात्री- अपरात्री रुग्णांना तातडीची सेवा मिळावी म्हणून येथे निवासी डॉक्टरांची गरज असल्याचे श्री भुजबळ यांनी सांगितले.

loading image
go to top