पदवीधर निवडणूक: पुण्यात कोण आहे आघाडीवर? मध्यरात्री लागणार निकाल

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 3 December 2020

उमेदवारांची मोठी संख्या आणि मतदानाचा वाढलेला टक्का यामुळे रात्री उशीरापर्यंत वैध-अवैध मतांची विभागणी करण्याचे काम सुरू होते.

पुणे- पुणे पदवीधर मतदार संघातील मतमोजणीला गुरूवारी सकाळी आठ वाजता सुरूवात झाली. उमेदवारांची मोठी संख्या आणि मतदानाचा वाढलेला टक्का यामुळे रात्री उशीरापर्यंत वैध-अवैध मतांची विभागणी करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे विजयासाठी आवश्‍यक असलेल्या मतांचा कोटा निश्‍चित होऊ शकला नसल्यामुळे निकाल येण्यास शुक्रवार सकाळ उजडणार असल्याचे स्पष्ट झाले. मध्यरात्रीनंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरूवात झाली. परंतु मतविभागणी करताना मोजून झालेल्या पहिल्या 1 लाख 23 मतांमध्ये प्रथम पसंती दिलेल्या उमेदवारांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण लाड पुढे असल्याचे चित्र होते. 

पुणे विभागात सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या पाचही जिल्ह्यातून पदवीधर मतदारसंघासाठी दोन लाख 47 हजार 50 मतदान झाले आहे. या निवडणूकीसाठी 62 उमेदवार रिंगणात होते. सकाळी आठ वाजता कडेकोट पोलीस बंदोबस्तात मत मोजणीला सुरूवात झाली. दुपारी तीन वाजेपर्यंत पाच जिल्हयातील मतपत्रिका एकत्रित करण्यात आल्या. त्यानंतर वैध आणि अवैध मतपत्रिकांच्या विभागणीचे काम सुरु करण्यात आले. रात्री आठ वाजेपर्यंत 1 लाख 23 हजार मतांच्या विभागाणीचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतर उर्वरीत 1 लाख 24 हजार मतातील वैध- अवैध मतांची विभागणीचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. मात्र मतदान केंद्र अधिकाऱ्यानी विभागणी करतानाच प्रथम पसंती दिलेल्या मतपत्रिकांची स्वतंत्र विभागणी करण्यात येत होती. त्यामध्ये या मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार लाड यांना सर्वाधिक मते असल्याचे चित्र होते. 

पदवीधर निवडणुकीत महाविकासची 'आघाडी'; मतमोजणी अद्याप सुरुच

पहिल्या फेरीतील वैध-अवैध मतांची विभागणी करण्यासाठी 112 टेबल करण्यात आले होते. प्रत्येक टेबलावर 1 हजार 100 मतांची मोंजणी करून त्यातून अवैध मते बाजूला काढण्यात आली.त्यामध्ये प्रत्येक टेबलवर एकूण मतांच्या सुमारे चार ते पाच टक्के मतांचे प्रमाण हे अवैध ठरत होती. तर रिंगणात 62 उमेदवार असले, तरी मतदारांनी उमेदवारांना पसंतीक्रमानुसार मते देताना एक ते पाच यांना दिला असल्याचे दिसून आले आहे. जवळपास नव्वद टक्के हे प्रमाण असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. संपूर्ण वैध-अवैध मतांची विभागणी झाल्यानंतर वैध मतांच्या पन्नास टक्के मते आधिक एक मत हे सुत्र धरून विजयीसाठीचा कोटा निश्‍चित करण्यात येईल. त्यानंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरूवात केली जाणार असल्याचे निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत विजयासाठीचा कोटा निश्‍चित झाला नव्हता. 

अशी होते मतमोजणी 

पुणे विभाग पदवीधर मतदार संघासाठी निश्‍चित केलेल्या मतांचा कोटा एखाद्या उमेदवाराने पूर्ण केला. तर तो विजयी घोषित केला जातो.जर हा कोटा पूर्ण झाला नाही, तर जो शेवटच्या क्रमांकाचा जो उमेदवार आहे. त्या उमेदवाराची दोन नंबरची मते कोणाला मिळाली, त्यांच्या पारड्यात टाकली जातात. त्यातूनही विजयासाठीचा कोटा पूर्ण झाला नाही, तर पुन्हा शेवटून दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारीची दोन नंबरची मते विचारात घेतली जातात. अशा प्रकारे 62 उमेदवारांची दुसऱ्या क्रमांच्या मतांची मोजणी करून एखाद्या उमेदवाराने आवश्‍यक त्या मतांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर तो उमेदवार विजयी घोषित केला जातो. 

आमच्या विजयांमूळे ठाकरे सरकारचं काउंटडाऊन सुरू- गिरीश महाजन

यंदाच्या मतमोजणीतील वैशिष्ट 
-मतमोजणीसाठी पाचही जिल्हयातील महसूल यंत्रणा एकत्रित 
- वैध-अवैध मतांची विभागणी रात्री उशीरापर्यत सुरू 
-विजयासाठीचा कोटा मध्यरात्री नंतर निश्‍चित 
-वैध-अवैध मतांची विभागणी करताना प्रथम पसंतीची मते वेगळी करण्यात आली. 
-त्यातून निवडणूकीचा काल 
-यंदा मतदारांनी पसंतीक्रम देताना एक ते पाच उमेदवारांनाच दिला. 
- मते बाद होण्याचे प्रमाण पाच टक्के 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune teacher constituency mahavikas aghadi on lead