रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा पंजाबवर एकहाती विजय

वृत्तसंस्था
रविवार, 14 मे 2017

पुणे- रायझिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब या सामन्यात पुण्याने 9 गडी राखून विजय मिळवला. हा सामना जिंकत पुण्याच्या संघाने आयपीएलच्या दहाव्या सत्राच्या बाद फेरीत प्रवेश केला. 

पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात पुण्याने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.  जयदेव उनाडकतने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर मार्टिन गप्टिलला बाद करून पंजाबची फलंदाजी गुंडाळण्यास सुरवात केली. त्यानंतर पंजाबचा पुर्ण संघ 73 धावात बाद झाला.

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या या 73 धावांना समोर जाताना पुण्याने चांगली सुरवात केली. राहुल त्रिपाठी 28 धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार स्टीवन स्मिथ व अजिंक्य रहाणे यांनी पुण्याला 9 गडी राखत विजय मिळवून दिला.
 
Web Title: Pune team won IPL match against Punjab