
Pune Crime News: जुन्या भांडणाच्या वादातून टेम्पो अंगावर घालून अल्पवयीन मुलाची चिरडून हत्या केल्याची घटना घडलीय. पुणे सातारा महामार्गावर वेळू गावच्या हद्दीत घडलेल्या घटनेनं खळबळ उडाली आहे. शनिवारी पहाटे अडीच वाजता ही घडटना घडली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.