
टेमघर धरणाच्या गळतीची दुरुस्ती केली आहे. ती ९० टक्के झाली आहे. उर्वरित दहा टक्के गळतीचे काम राहिले असले तरी टेमघर धरणाला आता धोका नाही. गळतीच्या उर्वरित कामात फाउंडेशन ट्रिटमेंट आणि ग्राउटिंगच्या कामांचा समावेश आहे.
यासाठी, राज्याच्या जलसंपदा विभागाने तांत्रिक मदत मागितली तर ती करण्यात येईल. अशी स्पष्टोक्ती केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन संस्थेकडून शुक्रवारी करण्यात आली.
संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. एस. कांकारा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, टेमघर धरणाची गळती प्रतिसेकंद 2147.73 लीटर एवढी होती. जलसंपदा विभागाकडून संस्थेकडे मदत मागितली होती.
त्यानुसार, संस्थेच्या अधिकाऱ्यांनी धरणाची पाहणी केली. सिमेंट, सिलिका, फ्लॅश ॲश यांसारखी सात प्रकारचे घटक एकत्रित करून मिश्रण तयार केले. ड्रिलिंग, ग्राउटिंग या पद्धतीने धरणाच्या बाहेरील बाजूच्या भिंतींमध्ये ९० अंशाच्या कोनात ड्रिलच्या सहाय्याने छिद्रे पाडली होती.