Pune Temperature: पुणे शहर आणि जिल्ह्यात यंदा उन्हाच्या तीव्र झळा सध्या जाणवत आहेत. आजच्या तापमानाच्या नोंदींनी तर पुणेकरांची नक्कीच झोप उडणार आहे. कारण पुण्यातील तापमानानं चक्क सर्वाधिक तापमान असलेल्या विदर्भालाही मागं टाकलं आहे. पुण्यातील लोहगावात सर्वाधीक तापमानाची नोंद झाली आहे.