Pune Terror Funding: सराफा दुकानातून लुटलेल्या सोन्याचा टेरर फंडिंगसाठी वापर! पुणे पोलिसांकडून मोठा खुलासा

पुण्यातील इसिस मोड्युल प्रकरणातील दहशतवाद्यांची दरोडेखोरी उघड
Gold Theft
Gold Theftesakal

पुणे पोलिसांनी गेल्यावर्षी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांच्या चौकशीत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या दहशतवाद्यांनी सराफाच्या दुकानात दरोडा टाकला होता त्यानंतर त्यातील लंपास केलेल्या सोन्याचा वापर त्यांनी टेरर फंडिंगसाठी केला होता. एबीपी माझानं यााबाबत वृत्त दिलं आहे. (Pune Terror Funding case use of gold looted from bullion shops for terror funding big revelation from Pune ATS)

Gold Theft
Electoral Bond: इलेक्टोरल बॉण्डबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला स्थगिती द्या; राष्ट्रपतींकडं विनंती अर्ज दाखल

लुटलेल्या सोन्याचा वापर टेरर फंडिंगासाठी

माध्यमांतील वृत्तानुसार, मोहम्मद युनुस खान आणि मोहम्मद याकूब साकीब अशा या दोन दहशतवाद्यांची नावं आहेत. पुणे पोलिसांनी त्यांना गेल्यावर्षी १८ जुलै रोजी अटक केली होती. हे दोघेही मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होते.

या प्रकरणाचा तापास केंद्रीय यंत्रणेकडं सोपवण्यात आला होता तसेच महाराष्ट्र एटीएसकडूनही या दोघांची चौकशी करण्यात येत होती. दरम्यान, पुणे एटीएसच्या टीमला चौकशी दरम्यान, या दोघांनी सराफाच्या दुकानात दरोडा टाकल्याची बाब समोर आली आहे. (Marathi Tajya Batmya)

Gold Theft
Punyashlok Ahilyadevi Nagar: अहमदनगर आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर म्हणून ओळखलं जाणार; मंत्रिमंडळाची नामकरणास मंजुरी

सराफा दुकानात दरोडा

त्यानुसार, साताऱ्यातील एका सराफा दुकानात या दोघांनी दरोडा टाकला होता. त्यातील लाखो रुपयांचे दागिने घेऊन ते पसार झाले होते. या दागिन्यांच्या विक्रीतून आलेला पैसा त्यांनी टेरर फंडिंगसाठी वापरला होता. (Latest Marathi News)

Gold Theft
Electoral Bond: "सर्व उघड करणार..."; इलेक्टोरल बाँड्स प्रकरणावर प्रतिक्रिया निवडणूक आयोगाचे प्रमुख काय म्हणाले?

पुणे शहरात केली होती रेकी

दरम्यान, पुणे पोलिसांच्या तपासात हे देखील उघड झालं होतं की, शहरातील विविध ठिकाणी रेकी केली होती. यामध्ये कोरेगाव पार्क, शनिवारवाडा आणि दगडुशेठ हलवाई मंदिर परिसराचा समावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com