esakal | पुणे: दुसऱ्या फेरीतील ‘कट- ऑफ’ देखील नव्वदीपार
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे: दुसऱ्या फेरीतील ‘कट- ऑफ’ देखील नव्वदीपार

पुणे: दुसऱ्या फेरीतील ‘कट- ऑफ’ देखील नव्वदीपार

sakal_logo
By
मिनाक्षी गुरव

पुणे: अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या नियमित फेरीचा ‘कट ऑफ’ ही नव्वदीपार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान शहरातील नामांकित महाविद्यालयांचा कला आणि विज्ञान शाखांचा ‘कट-ऑफ’ पहिल्या यादीच्या तुलनेत दुसऱ्या यादीत काहीसा वाढल्याचे निदर्शनास येत आहे. तर काही महाविद्यालयांचा पहिल्या आणि दुसऱ्या यादीतील ‘कट-ऑफ’ सारखाच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे.

हेही वाचा: 'राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महिलांवर हात उचलतात; मला अजून न्याय नाही मिळाला'

इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या नियमित फेरीतील अंतिम गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर झाली. या यादीत शहरातील नामांकित महाविद्यालयाचा विज्ञान शाखेसह कला शाखेचाही ‘कट ऑफ’ यावर्षीही नव्वदीपार आहे. यंदा शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा, तर सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचा कला आणि विज्ञान शाखेचा दुसऱ्या यादीत ‘कट-ऑफ’ हा पहिल्या यादीपेक्षा साधारणत: एक टक्क्यांनी जास्त असल्याचे दिसून येत आहे.

तर फर्ग्युसन महाविद्यालय, बीएमसीसी, सिंबायोसिस महाविद्यालय, गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स अशा नामांकित महाविद्यालयांचा ‘कट ऑफ’ अवघ्या काही गुणांनी कमी झाला आहे. दुसऱ्या यादीत विद्यार्थ्यांनी आपले महाविद्यालयांचे पसंतीक्रम बदलल्यामुळे हा काही महाविद्यालयांचा ‘कट-ऑफ’ काही गुणांनी वाढल्याचे दिसून येत आहे.

शहरातील नामांकित महाविद्यालयांमधील दुसऱ्या नियमित फेरीतील कट-ऑफ (टक्केवारीत) :

महाविद्यालयाचे नाव : कला : वाणिज्य : विज्ञान

फर्ग्युसन महाविद्यालय : ९६.४० टक्के (इंग्रजी), ८४.८० टक्के (मराठी) : --- : ९६ टक्के

लक्ष्मणराव आपटे कनिष्ठ महाविद्यालय : --- : ७९.६ टक्के : ९५.६० टक्के

बीएमसीसी : --- : ९४.८ टक्के : ---

मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर : ८९.६० टक्के (इंग्रजी), ६९ टक्के (मराठी) : ८७.८० टक्के : ९३ टक्के

स. प. महाविद्यालय : ९४ टक्के (इंग्रजी), ७७ टक्के (मराठी) : ८९.२० टक्के  : ९२.६० टक्के

गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स : --- : ९०.२० टक्के : ---

सिंबायोसिस महाविद्यालय : ९३.८० टक्के (इंग्रजी) : ९१.८०टक्के : ---

आबासाहेब गरवारे महाविद्यालय : ७३ टक्के (मराठी माध्यम) : --- : ९०.८ टक्के

महिलाश्रम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय : ७१.२० टक्के : ... :  ९३.८० टक्के

नूमवि हायस्कूल आणि कनिष्ठ  

महाविद्यालय : --- : ७९.६० टक्के : ८७.२०  टक्के

नेस वाडिया महाविद्यालय : --- :८४.६० टक्के : ---

नौरोसजी वाडिया महाविद्यालय : ८७.२० टक्के (इंग्रजी) : --- : ८७.२० टक्के

loading image
go to top