Pune : सायकल वारीतून अध्यात्म, मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : सायकल वारीतून अध्यात्म, मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश

Pune : सायकल वारीतून अध्यात्म, मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

पुणे (इंदापूर) : इंदापूर सायकल क्लब च्या वतीने कार्तिक एकादशी निमित्त इंदापूर ते पंढरपूर अशी १३७ किलोमीटर सायकल वारी काढून सायकल चालवा, निरोगी रहा,अध्यात्म, पर्यावरण संतुलन, मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश देण्यात आला.

इंदापूर नगरपरिषद प्रांगणातील छत्रपती शिवाजी राजे तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्यास अभिवादन करून सकाळी सहा वाजता सायकल फेरीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर टेम्भुर्णी, करकंब भोसे करत सायकल वारी पंढरपूर येथे पोहोचली. येथे चंद्रभागा नदीत स्नान केल्यानंतर सर्वांनी विठूनामाचा जयघोष केला . त्यानंतर नामदेव पायरीचे दर्शन घेऊन सायकल वारीचा समारोप पुन्हा इंदापूर नगरपरिषद प्रांगणात करण्यात आला. या सायकल वारीत दशरथ भोंग, प्रशांत शिताप ,विकास खिलारे, सचिन परबते, योगेश काटे, विष्णुपंत खरात, उमेश राऊत, रमेश शिंदे, पांडुरंग माने, संजय राऊत, तुषार सरडे, मोहिनी दळवी, श्वेता राऊत आणि मुक्ता भोंग यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा: एसटीचं विलीनीकरण तुर्तास नाहीच; मूळ वेतनवाढीला मंजुरी

यावेळी दशरथ भोंग म्हणाले, कोरोना महामारीमुळे रोगप्रतिकारक शक्तीचे महत्व सर्वांना पटले आहे. त्यामुळे मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती, अध्यात्म संवर्धन, पर्यावरण संतुलन, सायकल चालवा, निरोगी रहा हा संदेश देत आम्ही ही सायकल वारी काढून श्री विठ्ठलास जग कोरोना व इतर विषाणूजन्य आजारापासून मुक्त होवू देत असे साकडं घातले.

loading image
go to top