Pune : जुन्नर मध्ये उभारणार जगातील सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा - शरद सोनवणे.

याबद्दलची माहिती भीमाशंकर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितली आहे
Pune : जुन्नर मध्ये उभारणार जगातील सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा - शरद सोनवणे.

पिंपळवंडी - :छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात मोठा पुतळा जुन्नर येथे उभारण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख माजी आमदार शरद सोनवणे यांनी मंगळवारी(ता.१२)चाळकवाडी येथील कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.

सोनवणे यांनी सांगितले कि कांस्य(ब्रॉन्झ) धातुमध्ये असणारा हा पुतळा स्वखर्चात एका वर्षाच्या आत उभा करून त्याचे लोकार्पण करणार आहे तसेच पुतळ्याची उंची,शिल्पकार व जागा निश्चित केलेली असुन त्याबद्दलची सविस्तर माहिती येत्या २९ सप्टेंबर रोजी देण्यात येणार असुन पुढील तीन महत्वपुर्ण घोषणा देखील त्यावेळी करणार आहे.

Pune : जुन्नर मध्ये उभारणार जगातील सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा - शरद सोनवणे.
Pune News : देवेंद्र फडणवीस करतात तरी काय -सुप्रिया सुळे

या पुतळ्याची नोंद सगळ्या जगाला घ्यावी लागणार आहे.

याबद्दलची माहिती भीमाशंकर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितली आहे त्यांनी त्याबद्दल सकारात्मक भूमिका दाखविली असुन येत्या चार दिवसात भेटण्याची वेळ दिली असून त्याबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाईल. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सोबत देखील यावर चर्चा केलेली आहे.तसेच खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना देखील याबद्दलची माहिती दिलेली आहे.

Pune : जुन्नर मध्ये उभारणार जगातील सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा - शरद सोनवणे.
PM Modi: 'D येणार आणि C जाणार..', 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान मोदींचा फॉर्मूला काय आहे? जाणून घ्या

ज्या प्रमाणे गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा statue of unity म्हणुन ओळखला जातो त्याच प्रमाणे शिवरायांच्या या पुतळ्यासाठी एका घोषवाक्याची गरज असुन जनतेने ते वाक्य सुचवावे व ते ९९६७०१०५०४ या क्रमांका वर पाठवुन देण्याचे आवाहन सोनवणे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com