
Pune Theatre Festival
Sakal
पुणे : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे चोखंदळ नाट्यरसिकांसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी देणाऱ्या नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या गुरुवार (ता. १८) ते शनिवार (ता. २०) या तीन दिवसांत जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिरात हा महोत्सव रंगणार आहे.