Pune : कात्रज परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरूच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Pune : कात्रज परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरूच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे (कात्रज) : मागील काही दिवसांपासून कात्रज परिसरात चोऱ्यांचे सत्र वाढल्याचे दिसत आहे. कात्रज-कोंढवा रस्ता परिसरातील शिवशंभोनगर गल्ली क्रमांक ४मध्ये हातोड्याने घराचे कुलुप तोडून २ लाख ६५ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी निरज ओझा (वय ३८) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानंतर खोपडेनगर परिसरात चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत.

खोपडेनगरमधील गौसुल आजम शहेंशा दस्तगीर दर्ग्यात अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दर्ग्याच्या पाठीमागील बाजूस खिडकीतून आत प्रवेश केला. यावेळी एक स्टीलची दानपेटी आणि चांदीचे चार घोडे चोरले आहेत. त्यासोबतच दर्ग्याशेजारी असणाऱ्या शंकराच्या मंदिरातदेखील चोरट्यांनी डल्ला मारत मंदिरातून दानपेटीतील पैसे चौरले.

हेही वाचा: ST Strike: "कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन उद्या सकाळी भूमिका स्पष्ट करु"

तसेच, वाघजाई देवी मंदिरातील दानपेटीही चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. मागील काही दिवसांत दिवसात चोरीचे चार प्रकार उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून पोलिसांविषयी नाराजी पसरली आहे. चोरीच्या घटना पोलिसांना रोखण्यात अपयश येत असल्याचे यातून दिसून येत आहे. दर्ग्यातील चोरीप्रकरणी साहिल खान (वय ३६) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत अज्ञातांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

loading image
go to top