पुणे : पाच गावात चोरट्यांचा धुमाकूळ; मंदिराची दान पेटी व चौदा घरे फोडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पुणे : पाच गावात चोरट्यांचा धुमाकूळ; मंदिराची दान पेटी व चौदा घरे फोडली

sakal_logo
By
दत्ता म्हसकर ः सकाळ वृत्तसेवा

जुन्नर (पुणे) : जुन्नरच्या पश्चिम भागातील एकाच मार्गावरील राजूर नंबर एक व दोन, कबाडवाडी,माणिकडोह व खामगाव या पाच गावात अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी (ता. ११) पहाटे एक ते तीन वाजण्याच्या सुमारास धुमाकूळ घातला.कबाडवाडी येथील मंदिरातील दानपेटी तसेच चौदा बंद घरे अज्ञात चोरट्यांनी सुमारास फोडली.एकाच रात्री मोठ्या प्रमाणात झालेल्या घरफोडीच्या या सलग घटनांमुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थ हादरून गेले आहेत.

पाच ते सहा जणांच्या चोरट्याच्या टोळीने हे कृत्य करणे असून माणिकडोह येथील ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये हातात कटावणी घेऊन जाणारे चोरटे जेरबंद झाले आहेत. सर्वच ठिकाणी बंद असलेल्या घरांच्या दरवाजाची कडी व कोयंडा तोडून चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. राजूर नंबर एक मधील लक्ष्मण लांडे रोहिदास सुपे, मारुती सुपे, हौसाबाई सुपे, गोविंद लाडके आणि सुनील सुपे यांच्या घरात चोरी झाली असून राजूर नंबर दोन या गावातील होनाजी मुंडे यांच्या घरात प्रवेश करून सामान अस्ताव्यस्त केले आहे. हौसाबाई सुपे यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रकमेवर चोरट्यानी डल्ला मारला याबरोबर दिवाळीचा फराळ फस्त करुन मगच चोरट्यांनी पळ काढला असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस पाटील रामदास मुंडे यांनी जुन्नर पोलिसांना घटनेची माहिती दिली आहे.

हेही वाचा: T20 WC : पाकचं काही खरं नाही, झुंजारु गडी सेमी फायनलला मुकणार?

माणिकडोह येथील भास्कर मनोहर ढोबळे,शीला वल्लभ ढोबळे, प्रकाश भिवाजी ढोबळे यांच्या बंद घरांची कुलपे अज्ञात चोरट्यांनी कटरच्या साह्याने तोडली. घरातील साहित्य इतर वस्तू अस्तव्यस्त करून टाकले. भास्कर ढोबळे यांच्या घरातील रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ढोबळे यांनी सांगितले. खामगाव येथील एक बंद घर देखील चोरट्याने फोडले. कबाडवाडी येथील विरोबा मंदिरातील दानपेटी फोडली.तसेच दयानंद कबाडी,विठ्ठल पापडे व सविन्द्रा बोऱ्हाडे व पवार यांची घरे फोडून सामान अस्ताव्यस्त करून रोख रक्कम लंपास केली असल्याचे सरपंच संतोष केदारी यांनी सांगितले.

थंडीचा वाढलेला कडाका यामुळे रात्री सर्वजण गाढ झोपेत असताना बंद घरे हेरून ह्या चोऱ्या करण्यात आल्या आहेत. घटनास्थळी ठसे तज्ञ तसेच डॉग स्कॉड बोलविण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचा तपास सुरू आहे.गुन्हे दाखल झाल्यानंतर चोरीस गेलेल्या ऐवजाची निश्चित माहिती उपलब्ध होईल.

loading image
go to top