Wagholi News : पुणे ते अयोध्या सायकलवारी,१६०० कि.मी. आठ दिवसात पार ; दोन महिलांसह १५ रायडर्स सहभागी

सह्याद्री सायकल रायडर्सच्या १५ रायडर्सनी पुणे ते आयोध्या हे सोळाशे किलोमीटर अंतर सायकल वरून आठ दिवसात पूर्ण करून श्री राम लल्लांचे दर्शन घेतले. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.
wagholi
wagholisakal

वाघोली : सह्याद्री सायकल रायडर्सच्या १५ रायडर्सनी पुणे ते आयोध्या हे सोळाशे किलोमीटर अंतर सायकल वरून आठ दिवसात पूर्ण करून श्री राम लल्लांचे दर्शन घेतले. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.              

२६ जानेवारी रोजी वाघोलीतून त्यांनी अयोध्येकडे प्रस्थान ठेवले. दररोज सरासरी २०० किलोमीटर अंतर त्यांनी पार केले. सह्याद्री सायकल रायडरचे अध्यक्ष गिरीष कुलकर्णी व कॅप्टन चेतन कोठावडे यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र भिडे ,संदीप डफळ, योगेश  सातव, युवराज दळवी ,सुनील बलकवडे, ऋषिकेश पाटील, तेजस पाठक, पंकज पाटील, सुचिता पंचवटीकर, पुनम रंधवे, आश्विन जोगदेव, नंदकुमार तांबे, स्नेहल सिंगारे, निलेश कुलकर्णी हे सायकल रायडर्स यामध्ये सहभागी झाले होते.

wagholi
Wagholi Accident : वाघोलीत दोन वाहनांचा अपघात; वाहन चालक जखमी

तीन फेब्रुवारीला ते अयोध्येत सायंकाळी चार वाजता पोहचले. सात वाजता त्यांनी श्री राम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. भर थंडीत निसर्गाचा आनंद लुटत या रायडर्सनी हे अंतर पार केले. रविवारी दुपारी ते परतीच्या प्रवासाला निघाले. आठ दिवसात सायकल वारी करून अयोध्येत पोहचलो याचा तर आनंद आहेच.

परंतु प्राणप्रतिष्ठेनंतर काही दिवसातच श्री राम मंदिरात दर्शन घेता आले याचे मोठे समाधान आहे. युवराज दळवी, सायकल रायडर. सहा ते सात लाख भाविक अयोध्येत सध्या सहा ते सात लाख भाविक आहेत. दर्शनासाठी ही मोठी रांग आहे. अयोध्येत सगळ वातावरण राममय आहे. दर्शनासाठी ही मोठी रांग असते. मात्र आम्हाला 15 मिनिटात दर्शन मिळाले. अशी माहितीही दळवी यांनी दिली.

छायाचित्रांची ओळ -- अयोध्या अयोध्येत पोहचलेले पुण्यातील १५ सायकल रायडर्स.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com