

Pune Bangalore New Highway Project Worth Rs 42000 Crore Announced
Sakal
पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी सरकारनं नवा प्रकल्प हातात घेतलाय. सहापदरी रस्त्याचा हा प्रकल्प असून यामुळे पुणे-बेंगलोर महामार्गावर असणारा वाहतुकीचा ताण कमी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. पुणे ते बेंगलोर हा ग्रीनफिल्ड महामार्ग विकसीत करण्याचं एनएचएआयने ठरवलं आहे. यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आलाय. ६९९ किमीचा हा मार्ग असून महाराष्ट्रात त्याची लांबी २०६ किमी इतकी असणार आहे.