पुणे ते बारामती आरोग्यवारीचे आज आयोजन

चार गटात ही स्पर्धा होणार असून त्यात 750 धावपटू सहभागी होणार
Pune to Baramati Arogyavari organized today
Pune to Baramati Arogyavari organized today

बारामती - विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती स्पोर्टस फाऊंडेशनतर्फे पुणे ते बारामती रिले रन या आरोग्यवारीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता. 24) चार गटात ही स्पर्धा होणार असून त्यात 750 धावपटू सहभागी होणार आहेत, अशी माहिती फाऊंडेशनचे प्रमुख आयर्नमॅन सतीश ननवरे यांनी दिली.

रविवारी पहाटे चार वाजता पुण्यातील सारसबागेतून या रॅलीला प्रारंभ होणार आहे बारामतीतील शारदा प्रांगणात संध्याकाळी सहा वाजता समारोप होणार आहे. चार टप्प्यात ही रॅली होणार असल्याची माहिती आयोजन कमिटीचे सदस्य रविंद्र थोरात, समीर ढोले, नाना सातव, गौतम काकडे, रविंद्र पांडकर, अजिंक्य साळी, मच्छिंद्र आटोळे यांनी दिली.

अल्ट्रारनर व गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड खेळाडू प्रीती मस्के ही 64 कि.मी. रनिंग करणार आहे , हॅप्पी फिट चॅम्पियनचे संस्थापक आणि मॅरेथॉन धावपटू अमित कुमार हे 100 किमी धावणार आहेत. तसेच लोकेश पाटील , राकेश कुमार , हेमंत पाटील , सुनील आगरकर, तामली बासू' औरंगाबादचे सचिन घोगरे , साताऱ्याचे विशाल घोरपडे सहभागी होतील.

या आरोग्यवारीच्या माध्यमातून एकूण 63,000 किमी सामूहिक रनिंग पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या विक्रमाची नोंद 2022 सालच्या " सर्वाधिक कि.मी. चा सार्वजनिक रिले रन " या अंतर्गत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com