Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

पुणेकरांच्या सेवेत लवकरच वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस दाखल होत आहे.
Vande Bharat Sleeper Express

Vande Bharat Sleeper Express

sakal

Updated on

पुणे - पुणेकरांच्या सेवेत लवकरच वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस दाखल होत आहे. रेल्वेमंत्र्यांनी मुंबई-बंगळूर या मार्गावर वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसला मंजुरी दिली असून ही गाडी पुण्याहून धावणार आहे. सध्या पुण्याहून बंगळूरला जाण्यासाठी उद्यान एक्स्प्रेसने १८ तास १५ मिनिटे लागतात, तर कोईम्बतूर एक्स्प्रेसला १९ तास २० मिनिटे लागतात. मात्र वंदे भारत एक्स्प्रेस १३ तासांत बंगळूर गाठणार आहे. जलद प्रवासामुळे प्रवाशांच्या वेळेत ५ तासांहून अधिक बचत होणार आहे. पुण्याहून धावणारी ही पहिली वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस ठरेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com