Pune News: पुण्यात उभे राहणार देशातील पहिले स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र; ‘सीओईपी’च्या चिखली कॅम्पसमध्ये ८०० कोटींची गुंतवणूक

Pune To Get Indias First Indigenous Battery Technology Centre: चिखलीतील अत्याधुनिक केंद्रातून स्वदेशी लिथियम-आयन व प्रगत रसायनशास्त्रावर आधारित बॅटरी सेल संशोधन, प्रोटोटायपिंग व प्रमाणीकरण; ‘आत्मनिर्भर भारत’ला चालना देणारी ८०० कोटींची गुंतवणूक
Pune Gets Indias First Indigenous Battery Technology Centre As COEP Chikhali Campus Attracts 800 Crore Investment

Pune Gets Indias First Indigenous Battery Technology Centre As COEP Chikhali Campus Attracts 800 Crore Investment

sakal

Updated on: 

-मीनाक्षी गुरव

पुणे : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या चिखली येथील रिसर्च पार्कमध्ये अत्याधुनिक स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी विद्यापीठ आणि जेएसडब्ल्यू ग्रुप कंपनीमधील जेएसडब्ल्यू प्रोजेक्टस् यांच्यात महत्त्वपूर्ण भागीदारी करण्यात येणार आहे. याद्वारे केंद्रात भारतातील पहिले स्वदेशी बॅटरी प्रोटोटायपिंग आणि पायलट स्केल संशोधन आणि विकास केंद्र उभारले जाणार आहे. तब्बल आठशे कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक असलेल्या आणि ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला बळकटी देणाऱ्या या केंद्रातून पुण्यातील शैक्षणिक परिसरात प्रथमच लिथियम-आयन सेल तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com