#PuneTraffic काँक्रिटीकरणाच्या संथ कामामुळे कोंडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

उरुळी देवाची - सोलापूर, नगरकडे जाणारी अवजड वाहने कात्रज-मंतरवाडी बायपास मार्गे शहराबाहेर पडत असल्याने या रस्त्यावर प्रचंड वर्दळ आहे. क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होत असल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यातच रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या अर्धवट व कासव गतीने सुरू असलेल्या कामामुळे हांडेवाडीतील चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होते.

होळकरवाडी, हांडेवाडीकडून ससाणेनगर-हडपसरकडे व कात्रज-सासवड रस्त्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचे क्रॉसिंग या चौकात होते. एकच खड्डेमय लेन असल्याने वाहन चालकांना वाहन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे या चौकात प्रचंड वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्याचे काम अर्धवट असतानाच काही ठिकाणी रस्ता दुभाजकाचे काम घाईने सुरू आहे. रस्ता दुभाजकासाठी वापरलेले ब्लॉक निकृष्ट दर्जाचे असून एका बाजूने तुटलेले दिसतात. रस्त्याच्या दर्जाबाबतच नागरिक प्रश्‍नचिन्ह निर्माण करीत आहेत. कामात सातत्य नसून खंड पडत असतो. खड्डे व धूळ यांमुळे श्‍वसनाचे व मणक्‍याचे विकार झाल्याचे अनेक वाहनचालक सांगतात. रस्त्याच्या कामाला गती देवून चौक परिसरातील काँक्रिटीकरण लवकर पूर्ण करावे, चौकात कायम स्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्‍ती करावी, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत. याबाबत माहिती घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळाला नाही.

रस्ता डिव्हायडरसाठी वापरलेले ब्लॉक निकृष्ट दर्जाचे व तुटलेले असून कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण होते.
 -  सचिन झांबरे, मनसे शाखाध्यक्ष

Web Title: Pune Traffic