Pune Traffic News : कोंडी फोडण्यासाठी शोधले ‘मार्ग’

पुणे महापालिका प्रशासनाकडून तब्बल २१ ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग, ग्रेडसेपरेटर, नदी व लोहमार्गावर पूल बांधण्यासाठी चाचपणी केली जात आहे.
Pune Traffic
Pune TrafficSakal

पुणे पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्याबरोबरच वाहतुकीला गती देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून तब्बल २१ ठिकाणी उड्डाणपूल, भुयारी मार्ग, ग्रेडसेपरेटर, नदी व लोहमार्गावर पूल बांधण्यासाठी चाचपणी केली जात आहे. त्यासाठी सल्लागारांची नियुक्ती केली जाणार असून, त्यांच्या अहवालानंतर कमी अडचणीच्या ठिकाणी कामांसाठीची प्रक्रिया सुरू करणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

रहदारीच्या ठिकाणचे मोठे रस्ते, नदी व लोहमार्ग अशा विविध ठिकाणी उड्डाण पूल, भुयारी मार्ग, ग्रेडसेपरेटर अशा विविध प्रकारच्या उपाययोजना करून वाहतुकीला गती देण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुुरू केले आहेत. त्या दृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळील मेट्रो मार्गिकेवर दुहेरी उड्डाण पूल तसेच गणेश खिंड रस्त्यावर भुयारीमार्गाचेही महापालिकेचे यापूर्वी नियोजन आहे. तसेच काही ठिकाणी खासगी सहभागातून (पीपीपी) पूल, भुयारी मार्गांच्या कामांनाही मंजुरी दिली आहे.

शहरातील वाहतुकीवर उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने दोन हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. सध्या सुरू असलेल्या कामांसोबतच २१ ठिकाणी उड्डाणपूल, नदी व लोहमार्गावरील पूल, भुयारी मार्ग तयार करण्याचे प्रस्तावित आहे. अडथळे कमी असणाऱ्या १५ ठिकाणी कामे करण्याचा विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे.

— विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

-अशी आहेत संभाव्य कामे

  • मुंढवा ताडीगुत्ता चौक ते वडगावशेरी नदीवरील पूल

  • कोरेगाव पार्क ते कल्याणीनगरला जोडणारा पूल

  • पानमळा येथून कर्वे रस्ता व सिंहगड रस्त्याला जोडणारा पूल

  • पुणे स्टेशन व संगमवाडीला जोडणारा लुंबिनीनगर येथील पूल

  • संगमवाडी येथील बिंदू माधव ठाकरे चौकात ग्रेडसेपरेटर/ उड्डाणपूल

  • येरवडा येथील आंबेडकर चौकात ग्रेडसेपरेटर/ उड्डाणपूल

  • विश्रांतवाडी चौकात ग्रेडसेपरेटर/ उड्डाणपूल

  • सोलापूर रस्त्यावरील काळूबाई चौकात ग्रेडसेपरेटर/ उड्डाणपूल

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळील चौकात ग्रेडसेप्रेटर

  • हरेकृष्ण मंदिर येथे ग्रेडसेपरेटर, शिवाजीनगर येथील चौकात ग्रेडसेपरेटर, मुंढवा चौक येथे उड्डाणपूल/ग्रेडसेपरेटर

  • दांडेकर पूल येथे ग्रेडसेपरेटर/उड्डाणपूल

  • लोहमार्गावरील उड्डाणपूल

  • घोरपडी-साधू वासवानी पूल , कोरेगाव पार्क - ससाणेनगर येथे उड्डाणपूल/ ग्रेडसेपरेटर, फुरसुंगी चौक

  • येरवडा येथील आंबेडकर चौकात ग्रेडसेपरेटर/ उड्डाणपूल

  • विश्रांतवाडी चौकात ग्रेडसेपरेटर/ उड्डाणपूल

  • सोलापूर रस्त्यावरील काळूबाई चौकात ग्रेडसेपरेटर/ उड्डाणपूल

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळील चौकात ग्रेडसेप्रेटर

  • हरेकृष्ण मंदिर येथे ग्रेडसेपरेटर, शिवाजीनगर येथील चौकात ग्रेडसेपरेटर, मुंढवा चौक येथे उड्डाणपूल/ग्रेडसेपरेटर

  • दांडेकर पूल येथे ग्रेडसेपरेटर/उड्डाणपूल

  • लोहमार्गावरील उड्डाणपूल

  • घोरपडी-साधू वासवानी पूल , कोरेगाव पार्क - ससाणेनगर येथे उड्डाणपूल/ ग्रेडसेपरेटर, फुरसुंगी चौक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com