Pune: बालेवाडी, बाणेरकडून चांदणी चौकाच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

traffic

Pune: बालेवाडी, बाणेरकडून चांदणी चौकाच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा

पुणे - पुण्यात आज दुपारच्या वेळी मुसळधार पाऊस झाला असून अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. बालेवाडी, बाणेर, पाषाणकडून चांदणी चौकाच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा आहेत.

हेही वाचा: गेहलोत यांच्या गदारोळानंतर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत 'हा' मराठी नेता आघाडीवर

गेल्या अनेक तासांपासून वाहनचालकांना या रस्त्यावर मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऑफिस सुटल्यानंतर संध्याकाळी बालेवाडी, पाषाण, बाणेर या भागातून मोठ्या संख्येने वाहने चांदणी चौकाच्या दिशेने येत असतात.

दरम्यान चांदणी चौकातील पुल तोडण्याचे काम सुरू असल्याने तेथील एक लेन बंद करण्यात आली आहे. पुलाच्या पिलरमध्ये ड्रिलींग आणि इतर कामे करण्यासाठी एक लेन बंद केली आहे. मात्र यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. मात्र वाहने मुव्हींग असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

आणखी २ दिवस हे काम सुरू राहणार असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Pune NewsTraffic