

Ganeshkhind Road Choked Due to Construction and Accident
Esakal
Ganeshkhind Road Traffic: पुण्यात पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा फटका पुणेकरांना बसलाय. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी वाहनांच्या रांगा लागल्यानं पुणेकर त्रस्त झालेत. गणेशखिंड रोडवर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे ३ मिनिटांच्या प्रवासाला तब्बल ४० ते ५० मिनिटं लागत आहेत. पुणे विद्यापीठ चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलीसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या भागात उड्डाण पुलाचे काम सुरू असल्यानं वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे. विद्यापीठ चौकापासून शिवाजीनगरकडे जाणारा रस्ता ब्लॉक झाला आहे. ३ ते ४ किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.