Viral Video : पुण्यात वाहतूक पोलिसांचा जलवा! नियम मोडणाऱ्यांना आणलं वठणीवर

वाहतुकीचे नियम अन् घेतलेला U Turn; खराडी बायपास येथील पुलाजवळील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video
Viral Video Sakal

पुणे : मागच्या काही दिवसांमध्ये पुण्यात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तर वाहतूक नियम मोडणाऱ्यां नागरिकांच्या विरोधात पुणे वाहतूक पोलिसांनी चांगलीच मोहीम राबवली आहे. फूटपाथवरून गाडी चालवणाऱ्यांवर तसेच विरूद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्यांवर पुणे पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.

Viral Video
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

पुणे पोलिसांच्या अधिकृत ट्वीटरवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये विरूद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्या दुचाकीस्वारांना चांगलाच धडा पोलिसांनी शिकवला आहे. सदर व्हिडिओ खराडी बायपास येथील नदीवरील पुलाजवळील आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून ही जनजागृती करण्यात येत आहे.

अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओमध्ये दोन दुचाकीस्वार विरूद्ध दिशेने गाडी चालवत घेऊन येताना दिसत आहेत. तर समोर पोलिसांचा ताफा बघितल्यानंतर या दोन्ही दुचाकी यु टर्न घेत परत गेल्या आहेत. Putting the 'U' in Unsafe Driving असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ पुणे पोलिसांच्या अधिकृत ट्वीटरवरून शेअर करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com