Pune Traffic Update
esakal
गरवारे ब्रिजच्या दुरुस्तीमुळे आज दुपारी १ ते ४ दरम्यान फर्ग्युसन कॉलेज रोड वाहतूक बंद राहणार
वाहनांसाठी प्रभात रोड, खंडोजी बाबा चौक आदी पर्यायी मार्ग पोलिसांनी सुचवले आहेत.
पुणे वाहतूक पोलिसांनी नागरिकांनी संयम पाळावा व पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.
पुणे : गरवारे ब्रिजवर महत्त्वाची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार (Pune Traffic Update) असल्याने आज दुपारी १ ते ४ च्या दरम्यान फर्ग्युसन कॉलेज रोडवरील (Fergusson College Road) वाहतूक तात्पुरत्या स्वरुपात बंद राहणार आहे. या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पुणे शहर वाहतूक पोलिसांनी (Pune City Traffic Police) केले आहे.