पार्टीला जातोय! रात्री आईला सांगितलं, पहाटे अपघातात चुलत भावांचा मृत्यू; भरधाव वेगात हँडब्रेक ओढला अन् सगळं संपलं

पुण्यातील कोरेगाव पार्क इथं भरधाव वेगात मेट्रोच्या पिलरला कार धडकून भीषण अपघात झालाय. या अपघातात पिंपरीतील दोन सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
Two Cousins Killed After Speeding Car Crashes Into Metro Pillar in Pune

Two Cousins Killed After Speeding Car Crashes Into Metro Pillar in Pune

Esakal

Updated on

पुण्यात कोरेगाव पार्क परिसरात झालेल्या अपघातात चुलत भावांचा मृत्यू झालाय. तर एक जण गंभीर जखमी झाला. रविवारी पहाटे भरधाव वेगात कार बंडगार्डन मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या बस स्टॉपला धडकली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. दोघेही पिंपरी चिंचवडचे असल्याची माहिती समोर आली आहे. अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला आहे. गंभीर जखमी झालेल्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com