वाहतुकीचे दुखणे

Transport
Transport

सार्वजनिक वाहतुकीचे खच्चीकरण, पादचाऱ्यांना अपायकारक असणारे प्रशासनाचे निर्णय, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि उपाययोजनांचा अभाव, यामुळे शहराची वाहतूक व्यवस्था गंभीर बनली आहे, अशी मते तज्ज्ञांनी चर्चासत्रात व्यक्त केली. लायन क्‍लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्‍ट ३२३४ डी २ रिजन ३, झोन ३ तर्फे वाहतूक जागृती दिनानिमित्त या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रातील तज्ज्ञांची मते...

आपल्या शहरामध्ये सार्वजनिक बससेवेचे राजकारण्यांनी ठरवून खच्चीकरण केले. प्रशासनानेही सार्वजनिक वाहतुकीस महत्त्व दिले नाही. तसेच, प्रशासनाच्या वैयक्तिक वाहने वापरण्यास पूरक निर्णयामुळे पादचारी 
भरडला गेला.

दहा वर्षांत शहराची वाहतूक कोंडी सुमारे अडीचपटीने वाढणार आहे. आता ज्या ठिकाणी पोचण्यास एक तास लागतो. त्याच ठिकाणी पोचण्यासाठी अडीच तासांपेक्षा जास्त वेळ लागणार आहे. हे टाळण्यासाठी खासगी वाहतुकीचे प्रमाण १० टक्‍क्‍यांपर्यंत कमी करावे लागेल.

वाहतूक नियमांचे पालन हे कायदा म्हणून करू नका, तर आपले आयुष्य वाचविण्यासाठी म्हणून नियमांचे पालन करा.

पादचारी प्रथम संस्थेचे अध्यक्ष प्रशांत इनामदार, आय गिफ्ट लाइफ संस्थेचे संस्थापक तेजपालसिंग बत्रा, हर्षद अभ्यंकर या तज्ज्ञांनी चर्चासत्रात भाग घेतला. या वेळी अभय शास्त्री, मिलिंद जोगळेकर, योगेश कदम उपस्थित होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com