पुण्यातील वाहतुकीत आज बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Transportation Changes

पुणे शहरातील मेट्रोच्या लोकार्पणासह विविध कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (ता. ६) पुणे दौऱ्यावर येत आहेत.

पुण्यातील वाहतुकीत आज बदल

पुणे - शहरातील मेट्रोच्या (Metro) लोकार्पणासह विविध कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) रविवारी (ता. ६) पुणे दौऱ्यावर (Pune Tour) येत आहेत. त्यानिमित्त रविवारी सकाळी दहा ते दुपारी दोन यावेळेत पौड रस्ता व कर्वे रस्ता वाहतुकीसाठी बंद (Transportation Close) ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे (Rahul Shrirame) यांनी केले आहे. डेक्कन जिमखाना येथील खंडोजीबाबा चौक, कर्वे रस्ता आणि पौड रस्ता (शिवतीर्थनगर) येथील वाहतूक रविवारी सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

वाहतुकीतील बदल व पर्यायी मार्ग...

1) गरवारे कॉलेज ते आनंदनगर मेट्रो जंक्‍शन येथील मुख्य कार्यक्रमामुळे खंडोजीबाबा चौक येथून पौड रस्त्यावरील शिवतीर्थनगरपर्यंत जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग : कर्वे रस्त्यावरून कोथरूडकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी टिळक चौकातून लालबहादूर शास्त्री रस्ता, सेनादत्त पोलिस चौकी, म्हात्रे पूलमार्गे डीपी रस्त्याने कोथरूडकडे जावे किंवा दांडेकर पूल मार्गे डीपी रस्त्याने गुळवणी महाराज पथ, करिश्‍मा सोसायटीमार्गे इच्छितस्थळी जावे.

2) पौड रस्त्यावरील शिवतीर्थनगरकडून खंडोजीबाबा चौकापर्यंत डेक्कनकडे जाणारी वाहतूकही बंद ठेवण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग : शिवतीर्थ- नगरकडून डेक्कनकडे जाणाऱ्या वाहनांनी मयूर कॉलनी, निंबाळकर बाग, डीपी रस्ता किंवा गुळवणी महाराज रस्त्याने नदीपात्रातून डेक्कन जिमखाना किंवा सेनादत्त पोलिस चौकी, शास्त्री रस्त्यामार्गे इच्छितस्थळी जावे.

Web Title: Pune Transportation Changes Today For Narendra Modi Tour

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..