Pune : येवलेवाडीत दोघांना बेदम मारहाण; एकाचा मृत्यू, एक जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेदम मारहाण

Pune : येवलेवाडीत दोघांना बेदम मारहाण; एकाचा मृत्यू, एक जखमी

पुणे (कोंढवा) : कोंढवा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील येवलेवाडी येथे दोघांना काठी आणि बांबूने जोरदार मारहाण करण्यात आली. सोमवारी पाच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. जखमीचा हात मोडला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव रवी कचरू नागदिवे (वय ५०) असे नाव आहे. तो उरुळी देवाची येथिल असून तो एका शाळेवर सुरक्षारक्षकाचे काम करत होता. जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव बालाजी चव्हाण असून तो रिक्षाचालक आहे. रवी उरूळी हा रिक्षा घेऊन एका महिलेला भेटण्यासाठी येवलेवाडी येथे आला असता त्याच्यावर अज्ञांताकडून हल्ला केला. त्यामुळे महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून झालेल्या काठीहल्ल्यात त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा: 'त्रिपुरा'बाबत PM मोदींची घेणार भेट; दिल्ली दौऱ्यापूर्वी ममतांचा एल्गार

दरम्यान, कोंढवा पोलिसांत या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत. तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी कोंढवा पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती कोंढवा पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सरदार पाटील यांनी दिली आहे.

loading image
go to top