Pune : कर्वेरस्त्यावर पीएमपीएलच्या धडकेत दोन अंध विद्यार्थी जखमी

रस्ता ओलांडणा-या दोन अंध विद्यार्थांना पीएमपीएल बसने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
pmpl
pmplsakal

कोथरुड- गरवारे महाविद्यालयाजवळ रस्ता ओलांडणा-या दोन अंध विद्यार्थांना पीएमपीएल बसने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.

वैभव विष्णू क्षिरसागर, वय २२, रा. वारजे माळवाडी (मूळ रा. हिंगोली) व मयुरी मुरलीधर गरुड, वय २०, रा. शासकीय वसतीगृह मोशी (मूळ रा. मातेगाव, ता. गेवराई, जि. बीड) या दोन विद्यार्थ्यांना पुणे स्टेशन वरुन एनडीए गेट कडे जाणा-या १४४-१ या बसने सकाळी साडे अकराच्या सुमारास उडवले. गंभीर दुखापत झालेल्या या विद्यार्थांना रुग्णालयात हलवण्यात आले.

वैभव हा एमए प्रथम वर्ष तर मयुरी बीएच्या पहिल्या वर्गात गरवारे महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. वैभवच आज प्रॅक्टीकल होत. वैभव व मयुरी या दोघांचीही घरची आर्थिक परिस्थिती दुर्बल आहे.

वैभवचा सहकारी असलेल्या ज्ञानेश्वर बळीराम वाबळे यांनी सांगितले की, आम्ही दोघे एकाच गावचे. मी सुध्दा अंध आहे. वैभवला वडील नाहीत. त्याची आई व दोन भावंडे गावाकडे असतात. वैभव अभ्यासू असून स्वबळावर जीवन घडविण्याची त्याची महत्वकाक्षा आहे. काहीही चुक नसताना त्याच्यावर आलेला हा प्रसंग आम्हा मित्रांनाही धक्का बसला आहे.

मयुरीच्या घरी दोन लहान भाऊ, आई, वडील आहेत. मयुरीचे काही शिक्षण आळंदीला झाले. बारावीचे शिक्षण तीने गेवराईत घेतले. बारावी नंतर तीने बीएसाठी पुण्यात शिक्षण घेण्याचे ठरवले होते. त्यानुसार तीने गरवारे महाविद्यालयात प्रवेश मिळवला. मयुरीच्या अपघाताचे वृत्त कळताच तीच्या घरचे बीड वरुन पुण्याकडे यायला निघाले आहेत.

डेक्कन पोलिस ठाण्यातील वरीष्ठ पोलिस निरिक्षक संदिपान पवार म्हणाले की, सदर घटनेची माहिती घेण्याचे व जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. पीएमपीएल चालकाला ताब्यात घेतले आहे.

या मुलांच्या हातात पांढरी काठी नव्हती असे कारण सांगून स्वतःची चुक झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे अंध असलेल्या ज्ञानेश्वर वाबळे यांनी सांगितले. वाबळे म्हणाले की, अंध, दिव्यांग स्वबळावर काही करण्याचा प्रयत्न करतात. परंतु बेजबाबदार लोक आमच्या प्रयत्नांना हाणून पाडतात. हे दुर्देवी आहे.

अपघात ग्रस्तांना मदत करणा-या हेल्प रायडर चळवळीचे कार्यकर्ते संतोष पोळ म्हणाले की, हे दोघे विद्यार्थी अंध असूनही व्यवस्थित चालले होते. परंतु पीएमपील चालकाच्या चुकीमुळे या मुलांवर आपत्ती कोसळली आहे. त्यांच्यावर योग्य उपचार होण्यासाठी सहकार्याची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com