पुणे : दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार

कोंढवा आणि वडकी परिसरातील अपघात
accident
accidentsakal

पुणे : शहरातील कोंढवा आणि वडकी परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात महिलेसह दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोंढवा आणि लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरधाव ट्रकचालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरून खाली पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (ता. २२) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास कोंढवा खुर्द परिसरातील शीतल पेट्रोलपंपाजवळ घडला. समिना आयकाम अली काझी (वय ४२ रा. कोंढवा ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी ट्रकचालक आरिफ बिसमिल्लाह खान (वय ३८, रा. मालेगाव, नाशिक) याला कोंढवा पोलिसांनी अटक केली. पोलिस उपनिरीक्षक बी. जी. शेंडगे या अपघाताचा तपास करीत आहेत.

वडकी घाट परिसरात ब्रेक निकामी झाल्याने टेम्पोने दुचाकीला धडक दिली. त्यानंतर टेम्पो खड्ड्यात पडून चालक ठार झाला. हा अपघात २१ मार्चला संध्याकाळी सहाच्या सुमारास दिवे घाटातील वडकी परिसरात घडला. दिलीप सोमनाथ साळुंखे (वय ३० रा. काळेपडळ, हडपसर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com