धक्कादायक : पुण्यात पुन्हा पोलिसांना कोरोनाचा संसर्ग; पोलिस आयुक्त काय म्हणाले?

pune two police employee corona virus report positive
pune two police employee corona virus report positive

पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागातील एका पोलिस ठाण्यातील पोलिसाला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या आणखी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.

नागरिकांचा कोरोना पासून बचाव करण्यासाठी पुणे पोलिस दलातील पोलिस अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस धडपडत आहेत. असे असताना काही दिवसांपूर्वी एका पोलिस कर्मचाऱ्याला व त्याच्या पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांच्यावर पिंपरी चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले.

दरम्यान, संबंधीत पोलिसांच्या संपर्कात आलेल्या १४ पोलिसांना तत्काळ क्वारंटाइन करण्यात आले होते. त्याचवेळी त्यांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज (मंगळवार) प्राप्त झाला. त्यानुसार, दोन पोलिसांचा अहवला पॉझिटिव्ह आला. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे

"पुणे पोलिस दलातील एका पोलिस कर्मचाऱ्यास काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्या कर्मचाऱ्यासमवेत असलेल्या आणखी दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पोलिसांना संसर्ग होऊ नये, यासाठी आम्ही मास्क, फेस शील्ड, ग्लोज अशा सर्व वस्तू देत आहोत. कामाच्या ठिकाणी व घरी गेल्यावर काय काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करत आहेत. तसेच पोलिसांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याचे काम पोलिस उपायुक्त वीरेंद्र मिश्र व त्यांची टीम तसेच डॉक्टरांची टीम काम करत आहे. पोलिस प्रशासन सर्व प्रकारची खबरदारी घेत आहे,त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही."
- डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com