एका वृत्त वाहिनीच्या 25 कर्मचाऱयांना कोरोना अन्...

वृत्तसंस्था
Tuesday, 21 April 2020

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर भारतात लॉकडानची घोषणा करण्यात आली. पण, भारतात कोरोनाची लागण होत असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एका वृत्त वाहिनीच्या 25 कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली.

चेन्नई : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर भारतात लॉकडानची घोषणा करण्यात आली. पण, भारतात कोरोनाची लागण होत असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एका वृत्त वाहिनीच्या 25 कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली.

गुड न्यूज! भारतात कोरोनाची पहिली चाचणी यशस्वी...

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, तमीळ न्यूज चॅनलमध्ये कार्यरत असणाऱ्या 94 कर्मचाऱयांची कोरोणा चाचणी करण्यात आली. अहवाल हाती आल्यानंतर 25 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये पत्रकार, कॅमेरामन आणि इतरांचा समावेश आहे. यामुळे न्यूज चॅनलला आपला लाईव्ह कार्यक्रम सुद्धा रद्द करावा लागला आहे. शिवाय, इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

एका टेरेसवरून दुसऱया टेरेसवर; पाहा फटकेबाजी...

दरम्यान, मुंबईतील ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या आठवड्यात पत्रकारांची संघटना टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनने मुंबईतील १६७ जणांची कोरोना चाचणी केली होती. या चाचणीचे रविवारी अहवाल आला. यामध्ये 167 जणांपैकी 53 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यामधील सर्वाधिक पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियामधील आहेत.

लॉकडाऊनमुळे चिमुकली 100 किमी चालली अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus 25 employees tamil news channel chennai tested positive coronavirus