Pune : दागिने नीट ठेवा असे सांगण्याच्या बहाण्याने लुबाडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Pune : दागिने नीट ठेवा असे सांगण्याच्या बहाण्याने लुबाडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे (उंड्री) : आताच एका महिलेला मारहाण करून दागिने लुटल्याची घटना घडली आहे. तुम्ही तुमचे दागिने नीट काढून ठेवा असे सांगून, बघू तुम्ही दागिने नीट ठेवले आहेत, असे म्हणत हातचलाखीने ६० हजार रुपये किमतीने दागिने चोरून चोरटे पसार झाला. ही घटना वानवडीतील चायना ग्रील रेस्टॉरंटशेजारील द फोन फाउंटन्स स्पासमोरील रोडवर घडली.

वानवडी पोलीस स्टेशनमध्ये ६० वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून, चार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिला वानवडीतील चायना ग्रील रेस्टॉरंटशेजारी असलेल्या द फोर फाउंटन्स स्पा समोरील सार्वजनिक रोडवरून जात होत्या. त्यावेळी चार अनोळखी व्यक्ती जवळ आल्या आणि पुढे एका महिलेला मारहाण करून दागिने लुबाडले आहेत.

हेही वाचा: ST Strike: "कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन उद्या सकाळी भूमिका स्पष्ट करु"

तुम्ही तुमचे दागिने नीट ठेवा असे सांगितले. त्याबरोबर महिलेने हातातील सोन्याच्या बांगड्या काढून ठेवल्या. त्यावेळी चोरट्यांनी तुम्ही दागिने नीट ठेवले आहेत, असे सांगत पाहण्याचा बहाणा करून हातचलाखीने दागिने लंपास करून पसार झाले. वानवडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जयंत जाधव पुढील तपास करीत आहेत.

loading image
go to top