Water Level : भूगर्भातील पाणीसाठ्याला ग्रहण! पुण्यातील भूजल पातळी तीन ते दहा मिटरने कमी

केंद्रीय भूजल मंडळाने (सीजीडब्ल्यूबी) केलेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक बाब आढळून आली आहे.
underground water level
underground water levelsakal
Summary

केंद्रीय भूजल मंडळाने (सीजीडब्ल्यूबी) केलेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक बाब आढळून आली आहे.

पुणे - शहर आणि परिसरात खळाळून वाहणाऱ्या पाच नद्या, शहराच्या उशाला असलेली सात धरणे आणि शहराच्या चहुबाजूंनी असलेल्या हिरव्यागार डोंगरामुळे भूजलाची प्रचंड सुबत्ता असलेले शहर, अशी ओळख असलेल्या पुणे शहरातील भूगर्भातील पाणीसाठ्याला गेल्या दशकभरापासून मोठे ग्रहण लागले आहे. चालू दशकात शहरातील भूजल पातळी ही तीन ते दहा मीटरने खोल गेली आहे.

केंद्रीय भूजल मंडळाने (सीजीडब्ल्यूबी) केलेल्या सर्वेक्षणात ही धक्कादायक बाब आढळून आली आहे. वाढत्या नागरिकीकरणामुळे वाढलेला भूजलाचा बेसुमार उपसा हेच यामागचे मुख्य कारण असल्याचे जलतज्ज्ञांचे मत बनले आहे. पुणे शहरातील उपनगरांमध्ये भव्यदिव्य इमारती वेगाने वाढत आहेत. यामुळे दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या वाढत असून, पुरेसा पाणीपुरवठा करण्यात महापालिका प्रशासन कमी पडत आहे. त्यातूनच उपनगरांमधील सोसायट्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचे आणि सोसायट्यांमध्ये विंधनविहिरी घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे भूजलातील पाण्याचा बेसुमार उपसा होऊ लागला आहे, हेच शहरातील भूजल पातळीत घट होण्याचे मुख्य कारण असल्याचे केंद्रीय भूजल मंडळातील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून पुणे शहर चहुबाजूने विस्तारत आहे. वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे जमिनीतील पाणीसाठे आटत चालले आहेत. दरम्यान, शहर व परिसरात मुळा, मुठा, पवना, देवनदी आणि रामनदी या पाच नद्या आहेत. या सर्व नद्यांचा संगम होऊन त्या पुण्यातून मुळा-मुठा ही एक नदी होऊन बाहेर पडतात. याशिवाय खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर, पवना, मुळशी आणि कासारसाई ही सात धरणे शहराच्या उशाला आहेत. विशेष म्हणजे ही सर्व धरणे जवळजवळ आहेत.

मोजमापाची तीन गटांत वर्गवारी

शहरातील भूजल पातळीचे मोजमाप करून, आलेल्या निष्कर्षांचे तीन गटांत वर्गीकरण केले जाते. यानुसार शून्य ते तीन मीटर पातळी असलेला एक, तीन ते दहा मीटरचा दुसरा आणि दहा मिटरपेक्षा जास्त असलेला तिसरा गट मानला जातो.

पुणे सध्या दुसऱ्या गटात

पुणे शहराची भूजल पातळी ही वर्षांनूवर्षांपासून शून्य ते तीन मीटर इतकी असे. यामुळे पूर्वी शहरात अगदी जमिनीत पाच फुटांवर पाणी लागत होते. आता मात्र पुणे शहर या गटात राहिलेले नसून ते तीन ते दहा मीटर खोल पातळी या दुसऱ्या गटात गेले आहे. यामुळे आता पाच फुटांऐवजी किमान ३० फूटांपर्यत पाणी लागत नसल्याचे आढळून आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com