पुणे : कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर

पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष : पापडेवस्ती-भोसले व्हिलेजजवळ कचराच कचरा
Pune Undri citizens health problem Garbage near Papadevasti bhosale village
Pune Undri citizens health problem Garbage near Papadevasti bhosale villagesakal

उंड्री : महापालिका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पापडेवस्ती-भोसले व्हिलेज (काळेबोराटेनगर) येथील बसथांब्याशेजारी कचराच कचरा साचला आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोग्य सुविधा नाही, पाणी नाही, रस्ते नाही, पदपथ नाही, पथदिवे नाही, उद्यान नाही, तरीसुद्धा आम्ही पालिकेला वाढीव आणि वेळेत कर भरतो, हा गुन्हा आहे का, असा संतप्त सवाल अॅड. अमरसिंग रजपूत यांनी उपस्थित केला आहे.

गजानन मोहिते म्हणाले की, हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये वारंवार तक्रार करूनही कचरा स्वच्छ केला जात नाही. त्यामुळे वाऱ्याच्या झोतात हा कचरा रस्त्यावर येतो, या कचऱ्यावरून पादचारी आणि दुचाकी घसरून अपघातात होत आहेत. खड्डेमय रस्त्यातून वाट काढताना जीव मेटाकुटीला येत आहे. पदपथावरील दिवे बंद असल्याने सर्वत्र अंधार असतो. त्यामुळे रात्री-अपरात्री महिला-मुली आणि कामगारवर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे, असे त्यांनी सांगितले.

पालिका प्रशसान पथ दिव्यांसाठी कर घेते. मात्र, ईलाईट ड्रीन सोसायटीच्या मुख्य रस्त्यावरील विद्युत दिवे बंद असल्याने रात्री-अपरात्री लुटमारीचे प्रकार सतत घडत आहेत. पालिका प्रशासनाने पथदिवे तातडीने सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी विजय घोडके, उमेश जाधव, नितीन निपाणी, अमोल भालेकर, वैभव शेटे, राहुल भादवणकर, गुलाब पवार, मोहन लोळे यांनी केली आहे.

काळेबोराटेनगर येथील शेवटचा पीएमपी बसथांबा आणि रेल्वे लाईनच्या बाजूने भोसलेनगरपर्यंत रस्त्याच्या बाजूला प्रचंड मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पालिका प्रशासनाने कचरा स्वच्छ करून औषध फवारणी करावी.

- माणिक दळवी, ईलाईट-ड्रीम सोसायटी, पापडेवस्ती

नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने आरोग्य विभाग कायम तत्पर सेवा देत आहे. नागरीवस्ती किंवा रस्ता, बसथांब्याजवळील कचरा दररोज स्वच्छ करीत आहे. मात्र, कोठे कचरा साचल्याची तक्रार कोणी केली, तर त्याची तातडीने दखल घेतली जाते.

-प्रसाद काटकर, सहायक आयुक्त, हडपसर क्षेत्रीय कार्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com