esakal | चहासाठी घरात आली आणि दागिने लुटून गेली!
sakal

बोलून बातमी शोधा

Tea

सदर महिला सुनेच्या ओळखीची असावी असे वाटल्याने रासकर यांनी तिला घरात बोलवले. अनोळखी महिला घरातील खाटेवर झोपली.

चहासाठी घरात आली आणि दागिने लुटून गेली!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिरूर (पुणे) : तब्येत बरी नसल्याचा बहाणा करून घरात आलेल्या महिलेने घरातील ज्येष्ठ महिलेला चहा करून देण्याची विनंती केली. आणि ज्येष्ठ महिला चहा बनवत असतानाच घरातील सोन्या-चांदीच्या दागिण्यांवर डल्ला मारून गुंगारा दिला. यावेळी सुमारे ऐेंशी हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि वीस हजार रूपये रोख असा ऐवज चोरीला गेला असल्याची माहिती शिरूर पोलिसांनी दिली अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हायस्पीड रेल्वे लोहमार्ग प्रकल्प ‘स्लो’;पुणे-नाशिक दरम्यान कामासाठी १५ दिवसांत बैठक

अण्णापूर (ता.शिरूर) येथे बुधवारी दुपारी घडलेला हा चोरीचा प्रकार सायंकाळी उशिरा उघडकीस आला. चंद्रभागा नाथू रासकर (वय ७०, रा. अण्णापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रासकर या बुधवारी दुपारी एकट्याच घरी होत्या. त्यांचा मुलगा, सून आणि नातवंडे शेतात गेले होते. दुपारी एकच्या सुमारास स्कूटीवरून एक महिला त्यांच्या घरी आली. 'ताई आहेत का', असे विचारल्यावर सूनबाईंची चौकशी ही महिला करीत आहे, असे वाटल्याने त्यांनी सूनबाई शेतात कामाला गेली असून, संध्याकाळी येईल, असे सांगितले. त्यावेळी संबंधित महिलेने प्यायला पाणी मागितले.

रासकर यांनी तिला पाणी दिल्यावर, 'मला खूप त्रास होत आहे, चहा करून देता का?, असे रासकर यांना विचारले. सदर महिला सुनेच्या ओळखीची असावी असे वाटल्याने रासकर यांनी तिला घरात बोलवले. अनोळखी महिला घरातील खाटेवर झोपली. रासकर यांनी चहा दिल्यावर काही वेळाने येथे जवळपास कुठे मेडिकल आहे का, अशी विचारणा करून ती निघून गेली. 

पुण्याला देशातील सर्वाधिक पर्यावरणपूरक शहर बनवणार: देवेंद्र फडणवीस​

दरम्यान, सायंकाळी सहाच्या सुमारास चंद्रभागा रासकर यांचा मुलगा, सून आणि इतर मंडळी घरी परतली. रासकर यांनी त्यांना दुपारी आलेल्या महिलेविषयी सांगितले, परंतु अशा कुठल्या महिलेबाबत काही माहिती नसल्याचे त्यांच्या सुनेने सांगितले. त्याचवेळी रासकर यांची नात वैष्णवी ही घर झाडून घेत असताना, तिला घरातील कपाटाचा दरवाजा उघडा दिसला आणि तिने आई चैतालीला याबाबत माहिती दिली. संशय आल्याने रासकर कुटुंबीयांनी कपाटातील साहित्याची तपासणी केली असता, कपाटातील तिजोरी उघडी दिसली. तिजोरीतील प्लॅस्टिकच्या डबीत ठेवलेले दागिनेही गायब झाल्याचे लक्षात आल्यावर रासकर कुटुंबीयांनी पोलिस स्टेशनकडे धाव घेतली.  

रासकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या घरातील कपाटाच्या तिजोरीतून दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र, एक तोळ्याच्या दोन अंगठ्या आणि एक तोळ्याचे कानातील वेल असे ऐेंशी हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि वीस हजार रुपये रोख चोरीला गेले.  

- आंबा प्रेमींसाठी गोड बातमी; पुणे मार्केट यार्डात हापूसची एन्ट्री!

घरातील ज्येष्ठ आणि एकट्या व्यक्तींना पाहून चोरटे बहाणा करून फसवणूक करू शकतात. अशा प्रकारात काही पुरूष चोरांचा सहभाग यापूर्वी दिसून आला होता. परंतू, आता महिलांच्या माध्यमातून हात साफ करण्याची क्लृप्ती चोरटे अवलंबत असल्याने घरी एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी खबरदारी घ्यावी. अनोळखी व्यक्तींना शक्यतो घरात घेऊ नये. घरातील व्यक्तींच्या परिचयाचे असल्याचे त्यांच्याकडून सांगितले गेले तरी कुटुंबातील व्यक्तींकडून खातरजमा करावी. मूळात घरात एकटे असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेशच देऊ नये. 
- प्रवीण खानापुरे, पोलिस निरीक्षक, शिरूर पोलिस स्टेशन

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top